गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची महत्वाची बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष अधिक प्रभावीपणे कामगिरी करून जनतेचा विश्वास संपादन करेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांनी व्यक्त केला.
त्यांनी कार्यकत्यांना एकजुटीने आणि नियोजनपूर्वक निवडणूक लढविण्याचे आवाहन केले.
या बैठकीस तालुका अध्यक्ष सूर्यकांत गरड, शहराध्यक्ष संदीप दारुंटे, गंगापूर साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब पाटील गावंडे, माजी नगरसेवक नईम मन्सुरी, मुनाफ कुरेशी, वाजेद कुरैशी, सुरेश पाटील, माजी सभापती सुभाष धोत्रे, बद्रीनाथ बारहाते, वाळूज सरपंच सईदाभाभी पठाण, महिला तालुकाध्यक्ष ज्योतीताई पंडीत, माजी पंचायत समिती सदस्य बबनराव म्हस्के, अनिल खवले, सरपंच नारायण चनघटे, सुभाष बनकर, गुलाबराव शेजूळ, विलासराव शेंगुळे, ज्ञानेश्वर वाघचौरे, लतीफभाई शेख, अनिल मते, नंदकिशोर बागल, मन्नूभाई मन्नूभाई शेख, नानाभाऊ सोनवणे, फैय्याज कुरैशी, संदीप पटारे, रफिकखा पठाण, इम्रान रहेमान खान, माजी सरपंच संतोष जाधव, चेतन काळे, रिचर्ड बत्तीसे, दिलीप थोरात, संघराज थोरात, समीर पठाण, रमेश फोलाने, गोरखनाथ बोडखे, पंढरीनाथ पाठे, विनोद सोनवणे, जावेद शेख, विक्रांत सोनवणे, गौतम पंडीत, विजय खंडागळे, किरण पानकर, नारायण गोल्हार, मसूदभाई शेख, राजेंद्र गावंडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.